केरळ-महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं ! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित
नवी दिल्ली – केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत, तर 159 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, केरळमध्ये 31 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 162 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत, देशात 44 हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 496 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 32,988 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी 36 हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील 79 टक्के नवे कोरोना रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत.
दरम्यान, देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख 44 हजारांच्या पुढे गेली आहे. यातच, कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता असून ती नोव्हेंबरमध्ये पीकवर असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
या पाच राज्यांत सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण –
केरल- 31,645
महाराष्ट्र- 5,131
आंध्र प्रदेश- 1,622
तमिळनाडू- 1,604
कर्नाटक- 1,224
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/