काय सांगता ! रात्रभर जागून खेळत होता गेम, झोप कमी झाल्याने गमवावा लागला जीव ?

Connect With Us

जास्तीत जास्त वेळ गेम खेळण्यात घालवण्याने पुरेशी झोप न मिळाल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे, लहान मुलांना गेम्सची सवय लागते आणि  हे गेम्स किती घातक ठरू शकतात हे याचचं  एक उदाहरण आहे, अस म्हणावं लागेल. ही धक्कादायक घटना थायलॅंडमधे घडली आहे.

या तरूणाच्या आईने याबाबत बोलताना सांगितलं की, माझ्या मुलाला रात्र-रात्रभर जागण्याची सवय होती आणि तो सकाळपर्यंत गेम्स खेळत राहत होता. जर त्याला कॉम्प्युटर मिळाला नाही तर तो मोबाइलवर गेम खेळत होता.

त्या पुढे म्हणाल्या की, त्या त्यांच्या मुलाच्या बाजूच्या रूममध्ये झोपत होत्या. मला अर्द्यारात्री त्याच्या बाथरूममध्ये आवाज येत होता. कारण तो रात्री आंघोळ करत होता. त्यानंतर तो रात्रभर गेम खेळत राहत होता. पण एका रात्री मी टेंशनमध्ये आले. कारण तो फोन उचलत नव्हता.

तो फोनही उचलत नव्हता आणि आपल्या रूमचा दरवाजाही उघडत नव्हता. त्यानंतर मी शेजाऱ्यांची मदत घेतली. त्यानंतर आम्ही त्याचा दरवाजा उघडला. मला दिसलं की, माझा मुलगा बेशुद्ध पडला आहे. त्याचा मोबाइल बाजूलाच पडला होता. मी कधीही विचार नव्हता केला की, गेम खेळल्याने माझ्या मुलाची ही स्थिती होईल.

याप्रकरणी बोलताना पोलिसांनी सांगितलं की, अशी शक्यता आहे की, तरूणाचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला असावा. कारण स्पष्ट आहे की, तो फार कमी झोप घेत होता. तसेच त्याला सकाळी उठून शाळेतही जायचं होतं. त्याच्या शरीराला पुरेसा आराम मिळत नव्हता. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us