चुकीच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विद्यार्थिनीची NASA मध्ये झाली होती निवड !

Connect With Us

मुंबई : दहावीतील विद्यार्थिनी दीक्षा शिंदेची नासा (NASA ) या जगप्रसिद्ध या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेत एमएसआय या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनलिस्ट म्हणून निवड झाली असल्याचं वृत्त काही दिवसाआधी समोर आलं होतं. दीक्षाने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हा संशोधनपर पेपर मे २०२१ मध्ये नासाला पाठवला होता. तसंच त्याच धर्तीवर अल्पसंख्याक सेवा संस्थेच्या फेलोशिपच्या व्हर्च्युअल पॅनलिस्ट म्हणून आपली निवड झाल्याचा दावा दीक्षा शिंदे हीनं केला होता. त्यासाठी नासाकडून मानधनही मिळत असल्याचं तिनं सांगितलं होतं.  परंतु यावर आता नासानं स्पष्टीकरण दिलं असून तिला फेलोशिप देण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच तिची निवड थर्ड पार्टीनं दिलेल्या चुकीच्या माहितीच्या अधारावर देण्यात आल्याचंही नासानं म्हटलं आहे.

काही जणांनी यानंतर उपस्थित केलेल्या शंकेनंतर एका  वृत्तसंस्थेनं नासाशी ईमेल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ‘दीक्षा शिंदे हीची नासाच्या कोणत्याही पॅनलवर नियुक्त करण्यात आलं नसून तिला मानधन देण्यात येणार नाही,’ असं ईमेलला उत्तर देताना नासाच्या कॅटरिन ब्राउन यांनी सांगितलं.

पॅनलिस्टची निवड करण्याची प्रक्रिया तिसऱ्या पक्षाकडून होते. दीक्षाबाबत देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे ही निवड करण्यात आली होती. यासाठी केवळ अमेरिकेचेच नागरिक पात्र आहेत. दीक्षाचा पेपर स्वीकारण्यात आलेला नसून तिच्या अमेरिकेच्या प्रवासाचा खर्चही नासा करण्याचा दावा चुकीचा असल्याचं ब्राउन यांनी इमेलद्वारे म्हटलं आहे. या प्रकरणी आता पुढील तपास नासाच्या महानिरिक्षक कार्यालयाद्वारे करण्यात येणार आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us