‘चूक केली पण ठीक आहे..’, शिल्पा शेट्टीची पोस्ट व्हायरल

Connect With Us

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ( Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) पोर्नोग्राफी प्रकरणात तुरूंगात आहे. गेल्या 19 जुलैला मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला बेड्या घातल्या आणि तेव्हापासून तो तुरूंगात आहे. पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी काही दिवस अचानक गायब झाली होती. ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ या शोमधूनही काही दिवस तिने ब्रेक घेतला होता. सोशल मीडियापासूनही ती दूर होती. पण आता पुन्हा एकदा शिल्पा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. आता शिल्पाने एक पोस्ट शेअर करत, सर्वांचे लक्ष वेधले  असून शिल्पाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. शिल्पाने शेअर केलेला हा फोटो एका पुस्तकातला आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की ‘केलेल्या चूकीची भरपाई आपल्याला आयुष्यभर करावी लागते,’ अशा आशयाची ओळ त्यात दिसत आहे. ही ओळ  सोफिआ लॉरेनची आहे. या पोस्टमधील आणखी एका ओळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मी चूक करणार, मी त्या चूकीतून शिकणार आणि स्वत:ला माफ करणार,’ अशी ती ओळ आहे. ‘चूक केली पण ठीक आहे,’ असे स्टिकर शिल्पाने हा फोटो शेअर करत दिले आहे.

यापूर्वीही शिल्पाने एक इन्स्टास्टोरी शेअर केली होती. ‘आपण आपल्या आयुष्यात पॉजचे बटण दाबू शकत नाही. प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. मग तुम्ही चांगल करा वा वाईट, काहीही होऊ देत, आयुष्य चालत राहणार. आयुष्यात एकमेव गोष्ट आपल्याकडे आहे आणि ती म्हणजे वेळ. आयुष्यातला प्रत्येक क्षण जगा,’ असा मॅसेज तिने शेअर केला होता

दरम्यान, शिल्पा काही दिवसांपूर्वी ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये परतली आहे. शिल्पा २०१६ मध्ये सुरु झालेल्या ‘सुपर डान्सर’च्या पहिल्या सीझनपासून या शोची परिक्षक आहे. शिल्पासोबत दिग्दर्शक अनुराग बासू आणि कोरिऑग्राफर गीता कपूर हे देखील पहिल्या सीझनपासून शिल्पासोबत शोचे परिक्षक आहेत. पतीच्या अटकेनंतर शिल्पा ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये दिसली नव्हती आता १ महिन्यानंतर शिल्पा शोमध्ये दिसली आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us