Tokyo Paralympics: टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवणारी भाविना पटेल ठरली पहिली भारतीय

Connect With Us

टोक्यो पॅरालिम्पिक २०२० :  (Tokyo Paralympics-2020) स्पर्धेत भारताच्या भाविना पटेलने (Bhavina Patel) महिलांच्या टेबल टेनिस (Table Tennis) सामन्यांच्या क्लास फोर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. राउंड ऑफ 16 मध्ये तिने ब्राझीलच्या ओलिविएराला मात देत विजय मिळवला. भाविनाने तिसऱ्या सेटमध्ये हा सामना जिंकला.

३४ वर्षीय भाविनाने ब्रिटनच्या मेगान शॅक्लेटॉनला ३-१ (११-७, ९-११, १७-१५, १३-११) असे संघर्षपूर्ण लढतीत नमवले. पहिल्या लढतीत पराभव पत्करणाऱ्या भाविनाने ‘अ’ गटात दोन सामन्यांत तीन गुण मिळवून दुसऱ्या स्थानासह बाद फेरीत प्रवेश केला.

दक्षिण कोरियाच्या ली-मि ग्यूने भारताच्या सोनलवर १०-१२, ११-५, ११-३, ११-९ अशी पिछाडीवरून मात केली. सलग दोन लढती गमावल्यामुळे सोनमचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.

दरम्यान,  भारताच्या भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक्सच्या टेबल टेनिस स्पर्धेत इतिहास रचला आहे. या खेळात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. भाविनाने ब्राझीलच्या खेळाडूला नमवत केलेल्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान या नंतर भाविनाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जगातील नंबर दोनची पॅरा टेबल टेनिसपटू असणाऱ्या सर्बियाच्या बोरिस्लावा पेरि (Borislava Perić) हिच्यासोबत असणार आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us