अभिमानास्पद ! महाराष्ट्राची लेक थेट NASA च्या पॅनेलवर
औरंगाबाद : महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी औरंगाबादच्या 14 वर्षांच्या दीक्षा शिंदेने केली आहे. तेही जगातल्या सर्वांत मोठ्या अवकाश संशोधन केंद्रातली पॅनलिस्ट म्हणून. दीक्षाची निवड NASA च्या एका फेलोशिपसाठी झाली आहे. 14 व्या वर्षी तिने लिहिलेला शास्त्रीय निबंध NASA ने प्रकाशित केला आहे आणि तिची आता त्यांनी MSI फेलोशिपसाठी निवड केली आहे. दीक्षाच्या या यशावर तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
इंटरनॅशनल जर्नल फॉर सायंटिफिक अँड इंजीनिअरिंग रिसर्च (IJSER) य़ासाठी दीक्षाने एक शोधनिबंध लिहिला होता. आपण कृष्णविवरात राहतो का? (We live in Black hole?) या शीर्षकाखाली तिने मे महिन्यात लिहिलेला हा प्रबंध NASA ला पसंत पडला. त्यांनी तिला तसा इमेल धाडला. हीच तिच्या फेलोशिपची सुरुवात होती.
तिने या एवढ्याशा वयात विज्ञान, अवकाश विज्ञान यांचा गाढा अभ्यास करून कृष्णविवरांवर एक प्रबंध लिहिला. तिने Black holes and God या थिअरीवर लिहिलेल्या निबंधाला NASA कडून दखल घेतली गेली. पण पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळालेलं नाही. तिने तीन वेळा या विषयावर मेहनत घेऊन लिहिलं तेव्हा तिला NASA कडून प्रसिद्धी मिळाली. दीक्षाचा शास्त्रीय लेख NASA ने त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. दीक्षानेच याबाबतची माहिती एका वृत्त संस्थेला दिली.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/