अटकेनंतर नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दिली ‘अशी’ प्रतिक्रीया
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिलीय. एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंना जे करायचंय ते करु देत, मला जे करायचयं ते मी करणार असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री पदावर ठाकरे कायम राहणार नाहीत असा टोलाही लगावला आहे. .
नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर एका वृत्तवाहीनीबरोबर व्हिडीओ कॉलच्या माध्यमाने त्यांनी संवाद शाधला. यावेळी महिला पत्रकाराने त्यांना उद्धव ठाकरेजी को क्या कहेंगे असा प्रश्न विचारला होता. त्यावर राणे यांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये कुछ नही कहूंगा असे म्हणत उद्धव यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच ते कायम मुख्यमंत्री राहणार नाहीत, अशाप्रकारे जर ते कायद्याचा गैरवापर करत असतील तर आम्ही सुद्धा राजकारणात आहोत असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
तसेच यावेळी त्यांनी आपण जेवत असताना आपल्याला अटक करण्यात आल्याचे सांगितले. तसेच पोलिसांकडे अटक वॉरंट नसताना मला संगमेश्वरात आणलं. त्यांचा हेतू चांगला नसून आपल्या जीवाला धोका असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच मी त्यांना कानाखाली मारेन असं म्हटलंच नसल्याचा दावाही राणे यांनी यावेळी केला.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/