राज्यात आज दिवसभरात ६ हजार ३८४ जण कोरोनामुक्त

Connect With Us

मुंबई : राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होणाऱ्यांपेक्षा कमी आढळून येत आहे, शिवाय रोज मोठ्याप्रमाणावर रूग्ण देखील करोनातून बरे होत आहेत.आज दिवसभरात राज्यात ६ हजार ३८४ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार ३६५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, १०५ करोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

परंतु  अद्यापही रोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ३६५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, १०५ करोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२१,३०५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.९७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,१५,९३५ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १३५६७२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us