पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला दिलं जाणार सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचं नाव !
पुणे : पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवलेल्या नीरज चोप्राचं नाव दिले जाणार आहे. भारतानं भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत १२१ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. भारताला भालाफेक स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळालं आहे. नीरजने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. तर दुसरीकडे भारताला १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.
पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला नीरज चोप्राचं नाव दिले जाणार असून सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट देणार असून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी १६ ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार देखील केला जाणार आहे. या मैदानाला ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ असं नाव देण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, नीरजला बढती दिली जाणार असल्याचं लष्कराच्या सूत्रांनी म्हटलं आहे. नीरजची ऑलिम्पिकमधील कामगिरी पाहून नियमांनुसार त्याला प्रमोशन मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण दलांनी नीरजने पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. नीरजच्या कामगिरीचा देशातील प्रत्येकाला अभिमान असून तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचं संरक्षण दलांनी म्हटलं होतं. नीरजला १५ मे २०१६ पासून ४ राजपूताना रायफल्सच्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आलंय.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/