लसींचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सिरम इन्स्टिट्युटनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पुणे : नुकतीच कोरोनाची स्थिती काही प्रमाणात दिलासदायक वळणावर आहे. देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु काही राज्यांकडून कोरोना लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची ५० टक्के मालकी अर्थात ५० टक्के शेअर्स सिरम इन्स्टिट्युटनं खरेदी केले आहेत.
सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेलं पत्रकच अदर पूनावाला यांनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केलं आहे. “देशातील लस उत्पादक उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं फार आवश्यक आहे. हेच साध्य करण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं शॉट कायशामधील ५० टक्के समभाग खरेदी केले आहेत. भारतीय लस उद्योग विश्वासाठी औषध पॅकेजिंग उत्पादनांचा अखंड पुरवठा होणं यामुळे शक्य होणार आहे”, असं अदर पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
It is important for the vaccine industry to be self-reliant for its raw materials #AtmanirbharBharat. With this in mind, @SerumInstIndia has acquired 50% stake in SCHOTT Kaisha to ensure uninterrupted supply of essential pharma packaging products for the Indian vaccine industry. pic.twitter.com/Lx81l70RT9
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) August 17, 2021
करोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. तसेच, नव्या करोनाबाधितांची संख्या देखील घटू लागल्याचं गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, आता तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात व्यापक लसीकरणाची मोहीम जरी हाती घेण्यात आली असली, तरी अजूनही दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. हा पुरवठा सुरळीत होणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं शॉट कायशामधील ५० टक्के समभाग खरेदी केले आहेत.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/