T20 World Cup : टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपचा श्रीगणेशा पाकिस्तानविरुद्ध करणार; वेळापत्रक जाहीर

Connect With Us

आयसीसीने या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. करोना विषाणूमुळे, भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जेतेपदाचा सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत २४ ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होईल.टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपचा श्रीगणेशा पाकिस्तानविरुद्ध करणार आहे.

सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात आठ संघ असून प्रत्येक गटात ४-४ संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर १२ फेरीत ६-६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. एक संघ पाच सामने खेळेल. सुपर १२ संघ २० मार्च २०२१ च्या आयसीसी क्रमवारीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. सुपर १२ फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील. सुपर १२ ची विभागणी दोन गटात करण्यात आली आहे. भारताचा समावेश दुसऱ्या गटात आहे. गट साखळीत भारत ५ सामने खेळणार आहे.

टिम इंडिया वेळापत्रक खालीलप्रमाणे-
२४ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३१ ऑक्टोबर- भारत वि. न्यूझीलंड, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता
३ नोव्हेंबर – भारत वि. अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
५ नोव्हेंबर- भारत वि. ब गटातील अव्वल संघ, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
८ नोव्हेंबर- भारत वि. अ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us