जाणून घ्या कोण आहेत सुभद्रा कुमारी चौहान ? ज्यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त गूगलने बनवले डूडल

Connect With Us

नवी दिल्ली :  सुभद्रा कुमारी चौहान यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त गुगलने सुभद्रा कुमारी चौहान यांच्या नावाचे डूडल बनविले आहे. ‘झांसी की रानी’ या कवितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी झाला. गुगलने सुभद्रा कुमारी चौहान यांच्या नावाचे डूडल बन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सुभद्रा कुमारी चौहान यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या पहिल्या महिला सत्याग्रही म्हणूनही ओळखले जाते. हे गुगल डूडल न्यूझीलंडच्या कलाकार प्रभा मल्ल्या यांनी तयार केले आहे. सुभद्रा कुमारी चौहान त्यांनी लिहीलेल्या ‘झांसी की रानी’ या कवितेसाठी ओळखल्या जातात. वीर रसाने भरलेली आणि काही ओळींमध्ये झाशीच्या राणीचे जीवन मांडणरी ही कविता आजही लोकप्रिय आहे.

सुभद्रा कुमारी चौहान यांची ‘झांसी की रानी'(Jhansi ki Rani) ही कविता हिंदी साहित्यामध्ये विशेष गाजली आहे. दरम्यान आज गूगलच्या होम पेज वर झळकणार्‍या डूडल वर सुभद्रा कुमारी चौहान या साडी मध्ये पेन पेपर घेऊन बसल्या आहेत. त्यांच्या मागे राणी लक्ष्मीबाई घोड्यावर स्वार होऊन दौडत असल्याचं चित्र आहे. तसेच इतर काही स्वातंत्र्यसेनानी देखील असल्याचं पहायला मिळत आहे.

सुभद्रा कुमारी चौहान यांनी हिंदी साहित्यामध्ये अनेक कविता शब्दबद्ध केल्या आहे. त्यापैकी झांसी की राणी विशेष गाजली. यामध्ये राणी लक्ष्मीबाईंचे वर्णन केले आहे.महिलांसोबत समाजात विविध स्तरावर केला जात असलेला दुजाभाव यावर मात करण्यासाठी, महिलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आवश्यक प्रेरणा देणार्‍या सुभद्रा कुमारी चौहान यांच्या कविता आहेत.

सुभद्रा कुमारी चौहान यांचा  वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचे ठाकूर लक्ष्मण सिंह चौहान ऑफ खांडवा यांच्यासोबत विवाह झाला. त्यांना 5 मुलं होती. पुढे त्या जबलपूरला स्थायिक झाल्या.

सुभद्रा आणि तिच्या पतीने पुढे महात्मा गांधींजींच्या असहकार चळवळी मध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांविरूद्ध सुरू केलेल्या चळवळीमध्ये तुरूंगात जाणारी ती पहिली महिला सत्याग्रही होती.1923 आणि 1942 मध्ये त्यांची रवानगी नागपूरच्या जेल मध्ये करण्यात आली होती. नागपूर वरून जबलपूरला जाताना एका रस्ते अपघातामध्ये 1948 मध्ये त्यांचे निधन झाले.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us