जिल्हा परिषदेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण
नाशिक : आज देशाचा 75 व्या स्वातंत्र्य दिन आहे. जिल्हा परिषदेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा उत्साहात साजरा करण्यात आला, जिल्हा परिषदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले, यानंतर अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व कर्मचा-यांनी राष्ट्रध्वजास सलामी देत शासकीय कन्या शाळेतील विद्यार्थिनीं समवेत राष्ट्रगीत म्हटले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उज्वला बावके उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) आनंदराव पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजीव म्हसकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) दीपक चाटे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णुपंत गर्जे, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी (लपा पूर्व) मंगेश खैरनार, कार्यकारी अभियंता इवद १ दादाजी गांगुर्डे, कार्यकारी अभियंता इवद २ एस एन नारखेडे, सहायक गट विकास अधिकारी दीपक वेंदे आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/