‘हम हिंदुस्‍तानी’ गाणं येतय प्रेक्षकांच्या भेटीला; अमिताभ बच्चन-लता मंगेशकरसह आणखी १३ दिग्‍गज कलाकार एकत्र

Connect With Us

१५ ऑगस्ट रोजी  स्वातंत्र्यदिना निमित्त ‘डीएचएमके धमाका रिकॉर्ड्स’ एक नवं गाणं  भेटीला घेऊन येतंय.‘हम हिंदुस्‍तानी’ या गाण्याचं एक पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये गाण्यातील सर्व दिग्गज कलाकार दिसून येत आहेत.

या गाण्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर यांच्यासह आणखी १३ दिग्गज कलाकार एकत्र येत  सुरांचा अविष्कार घडवणार आहेत. सहकार आणि एकतेचं दर्शन घडवत भारतातील महामारीच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्वांना एकत्र करून नव्या आशेचा किरण देणारं हे गाणं असणार आहे.

या गाण्यात बिग बी आणि लता मंगेशकर यांच्या व्यतिरिक्त पद्मिनी कोल्हापुरी, अनिल अग्रवाल, सोनू निगम, कैलाश खेर, अलका याग्निक आणि शब्बीर कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपला आवाज दिलाय.

इतकंच नव्हे तर श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, श्रुति हसन, तारा सुतारिया, अंकित तिवारी, सिद्धांत कपूर आणि जन्नत जुबेर सारखे स्टार्स सुद्धा या लेजंडरी सॉन्गमध्ये आपला आवाज देणार आहेत. प्रियांक शर्मा आणि पारस मेहता यांच्या ‘धमका रेकॉर्ड्स’ या म्युझिक लेबलअंतर्गत हे गाणं तयार करण्यात येणार आहे.

‘हम हिंदुस्तानी’ या गाण्यात पहिल्यांदाच बॉलिवूडमधील सर्व दिग्गज कलाकार आपला आवाज देताना दिसून येणार आहेत. हे सर्व कलाकार आपल्या सूरांमधून आता आशा, एकता आणि देशभक्तीची खरी भावना जागृत करणार आहेत.


Connect With Us