‘बचपन का प्यार’ गाण म्हणणार्या चिमुकल्याला २३ लाखांची कार गिफ्ट!
‘बचपन का प्यार’ गाण्यानं गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला असून या गाण्यावर अनेक व्हिडिओ आणि मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. सपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे…” हे गाणं काही बॉलिवूड गाणं नसून सुकमा येथील सहदेव नावाच्या चिमुकल्या मुलानं गायलं आहे. सोशल मीडियात हे गाणं व्हायरल झाल्यानंतर सहदेव रातोरात स्टार झालं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिजनंही या गाण्यावर काही व्हिडिओ आणि रिल्स तयार केले आहेत. रॅपर आणि गायक बादशाह यानंही सहदेव सोबत ‘बचपन का प्यार’ हे गाणं रिलिज करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचं चित्रीकरण देखील नुकतंच पूर्ण झालं आहे. ११ ऑगस्ट रोजी हे गाणं प्रदर्शित होणार आहे.
यातच आता एमजी मोटर्सच्या शोरुमच्या मालकानं सहदेवच्या गाण्यावर खूश होऊन त्याला २३ लाख किमतीची एमजी हेक्टर एसयूव्ही कार गिफ्ट म्हणून देऊ केली आहे. विशेष म्हणजे ही कार इलेक्ट्रीक कार आहे.
सहदेव एका छोट्याशा गावात राहात असून त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरात मोबाइल, टीव्ही व इतर कोणत्याच सुखसोयी नाहीत. दुसऱ्याच्या मोबाइलवर गाणं ऐकून त्यानं हे गाणं शाळेत गायलं होतं. आयुष्याला कलाटणी मिळण्यासाठी फक्त एका क्षणाची गरज असते आणि सहदेवच्या बाबतीतही तेच झालं आहे. सहदेवला मोठं होऊन एक उत्तम गायक व्हायचं आहे असं तो सांगतो.
गाडीचे फिचर्स
एमजी झेडएस ईव्ही फेसलिप्ठ मॉडेलमध्ये ४४.५kWh हायटेक बॅटरी देण्यात आली आहे. यातून ४१९ किमी क्षमतेची रेंज मिळते. १०० किमी प्रतितास वेग फक्त ८.५ सेकंदात गाठता येतो अशा दमदार फिचर्सनं सज्ज असलेली कार सहदेवला गिफ्ट देण्यात आली आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/