मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये दाखल
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काही वेळापूर्वी ओझर विमातनळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समवेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचेही आगमन झाले. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, आमदार सरोज आहेर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील विविध प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे
दरम्यान, येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यापैकी कंपोझीट इनडोअर फायरिंग रेंज, सिंथेटीक ट्रॅक ॲस्ट्रोटर्फ फुटबॉल व हॉकी मैदान व्हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदान आणि निसर्ग उद्यान नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्प या विकास कामांचा समावेश आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/