देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ३५३ कोरोना रुग्णांची नोंद

Connect With Us

नवी दिल्ली –  आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार,गेल्या 24 तासांमध्येदेशात ३८ हजार ३५३ करोनाबाधित आढळले असून ४९७ जणांचा मृत्यू झालायं.

याचबरोबर, देशभरात गेल्या 24 तासांत 40013 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच सक्रिय रुग्ण संख्या 2,157 ने कमी झाली आहे. सध्या, देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3,86,351 एवढी आहे. ही संख्या गेल्या 140 दिवसांनंतरची सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. तर रिकव्हरी रेट 97.45%पर्यंत पोहोचला आहे.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 20 लाख 36 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. तर यांपैकी 4 लाख 29 हजार 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 20 हजार लोक बरेही झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांपेक्षा कमी झाली आहे.


Connect With Us